जुन्या शिक्षणाची नवी दिशा...
जुन्या शिक्षणाची नवी दिशा... मानव विकासच महत्त्वाचं साधन म्हणजे शिक्षण होय... म्हणूनच शिक्षण देणे म्हणजे मानव संसाधन चा विकास करणे होय.. देशाची संपती(भांडवल), हे त्या देशाचे नागरिक असतात.. यामुळेच सरकार शिक्षणात गुंतवणूक करत असते...कारण त्यांना सुजाण नागरिक ,संवेदन शिल मन असणारे नागरिक घडवायचे असतात मात्र , असे करत असताना शिक्षणाचं धोरण हे सुयोग्य, काळा नुसार बदल आत्मसात करणार असावं... ही मागणी अनेक वर्ष जोर धरत होती. सरतेशेवटी २०२० उजडावे लागले... आपल्या शिक्षण पद्धतीत काही दोष होते...जसे की , न समजताच करावे लागणार पाठांतर, विद्यार्थ्याला विचार करण्या पासून परावृत्त करनाऱ्या पद्धती, अंगभूत गुणा पेक्षा निकाल पत्रा मधील गुणा ला अतिमहतत्व देणं , कला शाखेला कमी महत्व ..इत्यादी.. असो दोष कितीही पण शिकवलं या व्यवस्थेने..! माणूस आपल्या चुकामधूनच शिकतो हे सकारात्मक मूल्य सुध्धा मला याच व्यवस्थेने शिकवले. आपण चुकलो हे सत्य स्वीकारा हेच तर शिकवलं बुद्ध आणि जैन धर्मा ने ...